


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )
सिरोंचा येथील बालाजी मंदिरासाठी 30 लाख रुपये खर्चाच्या सीसी रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन नगर पंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या करण्यात आले.
याप्रसंगी पाशा म्हणाले की, गावाची प्रगती फक्त पक्क्या रस्त्यांमुळे होते. 80 टक्के लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. त्यामुळे गावांचा विकास सर्वात महत्त्वाचा आहे. मी नगरपंचायतीचा उपाध्यक्ष झाल्यापासून, संपूर्ण सिरोंचा परिसरातील कच्चे रस्ते पक्के करून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. गावातील रस्ते पक्के करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. जेणेकरून लोकांना ये-जा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. आज झालेल्या भूमिपूजनाचे श्रेय गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना जाते. आज तुमच्यामध्ये येऊन खूप आनंद होत आहे. येणाऱ्या काळात शहराचा विकास आणखी वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूमिपूजन कार्यक्रमास सिरोंचातील प्रतिष्ठीत नागरिक व तसेच सितापती गट्टू, ब्रम्हानंद कोत्तागट्टू, इंदिरा, व्यंकटय्या पेंड्याला, सत्यनारायण दशरथी, अनिल रमेश, बोलमपल्ली रमेश, मोगलराज पेद्दापल्ली, जयेंद्र श्रीपती, संजय पेद्दापल्ली, अंकुलू बक्तू, शंकर मार्गोनी, श्रीनिवास मार्गोनी, तुषार येंडे, सलाम शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.



























