जहाल नक्षलवादी शंकरला तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथून अटक -हत्येसह अनेक गुन्ह्यात होता सहभाग; २ लाखाचे होते बक्षिस

889

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली(विशेष प्रतिनिधी)
सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायासह एका इसमाच्या हत्येत सक्रिय सहभाग असलेल्या जहाल नक्षलीस जिल्हा पोलिस दलाने मोठ्या शिताफीने गुरुवारी, (दि.४) तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथून अटक केली आहे़ शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (२५) रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) असे अटकेतील जहाल नक्षलीचे नाव असून त्याचेवर शासनाने २ लाखांचे बक्षिस घोषित केले होते़
जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सप्टेंबर 2018 मध्ये छत्तीसगड येथील नॅशनल पार्क एरीयामधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. त्याने गडचिरोली येथील पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर काम केले. मर्दिनटोला, पैडी आदीसारख्या चकमकींमध्ये अनेक माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झाले होते. पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या तीव्र अभियानामूळे त्याच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्यामूळे पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी तो सन 2024 मध्ये दलम सोडून घरी परत आला होता. घरी 7 ते 8 महिणे शेतीची कामे केल्यानंतर आंध्रप्रदेश येथील एंटापूर व त्यानंतर हैद्राबाद येथे राहून काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांद्वारे त्याचेवर गोपनियरित्या पाळत ठेवण्यात आली होती़ दरम्यान दिनांक गुरुवारी त्याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, नोव्हेंबर 2023 मध्ये कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले़ त्याचेवर अहेरी पोलिस ठाणे येथे दाखल विविध गुन्ह्याअन्वये अटक करण्यात आली. माओवाद्यास न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांचा पोलीस कोठडी सुणावली आहे़
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रिक इंटेलिजन्स शाखेचे सपोनि. प्रशांत बोरसे, पोउपनि अक्षय लव्हाळे, पोउपनि. पवन जगदाळे, संतोष नरोटे, राहूल दुर्गे तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी पार पाडली़

अटक माओवाद्याचा दलममधील कार्यकाळ –
शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सप्टेबर २०१८ मध्ये नॅशनल पार्क एरीया मधील मद्देड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे डिसेंबर २०१८ पर्यंत काम केले. त्यानंतर गडचिरोली डिव्हीजनमध्ये डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ असाम ऊर्फ शिवा ऊर्फ शिवय्या यांचे अंगरक्षक म्हणून सन २०२२ पर्यंत काम केले. पेरमिली दलममध्ये २०२४ पर्यंत सदस्य पदावर काम केले. त्याचा २०२० येडदर्मी जंगल, 2021 मध्ये मडवेली जंगल, 2023 मध्ये वेडमपल्ली तर 2024 मध्ये चितवेली जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये कापेवंचा येथील मजी चिन्ना आत्राम या निरापराध इसमाच्या खुनातही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता़

चार वर्षात 108 नक्षल्यांना अटक –
गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याने जिल्ह्यात नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे़ मागील पाच वर्षात अनेक चळवळीतील मोठ्या नेत्यांसह नक्षल सदस्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे़ तसेच जिल्हा पोलीसांच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत जहाल नेत्यांसह नक्षल सदस्य असे एकुण 108 माओवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here