महाशिवरात्रीनिमित्त भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवार तर्फे वैरागड येथे महाअभिषेक व भजन स्पर्धा -सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती

172

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
गडचिरोली(प्रतिनिधी) महाशिवरात्रीनिमित्त ८ व ९ मार्च रोजी सायंकाळी भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवार वैरागडच्या वतीने महाअभिषेक व भजन स्पर्धा वैरागड येथे भोलूभाऊ सोमनानी यांचे घरासमोरील आवारात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मुंबईच्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेला सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त डॉ. चरणजितसिंग सलुजा उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन वैरागडच्या सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य संगीता मेश्राम, आदेश आकरे, सत्यदास आत्राम, चंद्रविलास तागडे, प्रतिभा बनकर, छानू मानकर, रेखा भैसारे, मनिषा खरवडे, गौरी सोमनानी, शितल सोमनानी, दिपाली ढेंगरे आदी उपस्थित राहणार आहेत. तर ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता महाहवनाला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजता सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता गोपालकाला सायंकाळी ६ वाजतापासून महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेत १० हजार १ रुपये प्रथम, ८ हजार द्वितीय, ६ हजार एक तृतीय, हजार एक चतुर्थ व पाचवे २ हजार एक रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. भजन मंडळाला कमीत कमी एक भजन महादेवाचे म्हणणे अनिवार्य आहे. तसेच ग्रामपंचायत वैरागड, मोहझरी, सुकाळा, कुरुंडी माल, देलनवाडी, मानापूर, कुलकुली, भाकरोंडी येथील सदस्य तसेच सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक व नाट्य कलावंतांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन भोलभाऊ सोमनानी व मित्र परिवार वैरागड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here