


सिरोंचा(प्रतिनिधी )राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज ० ते ५ वयोगटातल्या बालकांना नगर पंचायत सिरोंचाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पोलिओ डोस पाजण्यात आला.
सिरोंचा तालुक्यात सर्व ठिकाणी लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली असून, वाड्या-वस्त्यांसह वीटभट्टी कामगार,कापूस वेण्यासाठी व मिर्ची तोड करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी फिरत्या मोबाईल पथकं देखील कार्यरत राहणार आहेत. पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन देखील राहून गेलेल्या बालकांना ही मात्रा दिली जाण्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कन्नाके यांनी सांगितले आहे.


या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पालकांनी जवळील केंद्रात जाऊन लस द्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यात मात्रा देण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस अवश्य द्यावा, असं आवाहन नगर पंचायत अध्यक्ष फरजाना इफ्तेखार शेख व उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी केलं आहे.
यावेळी नगर पंचायत अध्यक्ष फरजाना शेख,उपाध्यक्ष बबलू पाशा, तालुका आरोग्य अधिकारी एस.एम. कन्नाके आणि ग्रामीण रुग्णालय व नगर पंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





























