ऐन नागपंचमीत दिले विषारी सापाला जीवदान

441

– दुचाकीत दडून असलेल्या सापाला सर्पमित्र पोलिस अंमलदार नईम शेख यांनी सुखरुप काढले बाहेर

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –सिरोंचा (प्रतिनिधी) सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच सापांचा प्रजनन काळ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळुन येत असतात. सिरोंचा तालुका सभोवताली ईद्रावती, गोदावरी व प्राणहिता नदयाने व जंगलाने व्यापलेला आहे काही दिवस अगोदर सिरोंचा येथे पुर येवुन गेला होता त्यामुळे सिरोंचा येथे साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान सिरोंचा शहरातील विविध ठिकाणी आढळून आलेल्या चार विषारी सांपाना सर्पमित्र असलेले पोलिस अंमलदार नईम शेख यांच्या पुढाकारातून जीवदान देण्यात आले.

एका  घटनेत शुक्रवारी सकाळी 6 वाजता नगसेवक रंजीत गागापुरपु हे नेहमी प्रमाणे बॅडमिंटन खेळण्यासाठी निघत होते. त्याकरिता दुचाकी काढत असतांना दुचाकीच्या स्पीड मिटरच्या खाली साप दडून असल्याचे निदर्शनास येऊन त्यांना धक्काच बसला. याची माहिती तत्काळ सर्पमित्र नईम शेख यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गागापुरपु यांचे घर गाठित सापाला तीन तासाच्या प्रयत्नानंतर फुरसे जातीच्या विषारी सापाला सुरक्षित बाहेर काढले.

सदर साप नागाच्या विषाच्या पाच पट जहाल असते. हा साप तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असून, पाठीवर नागमोडी रेषा असते. सरासरी लांबी दीड फूट (46 ते 55 सेंटीमीटर), डोके त्रिकोणी व डोक्यावर बाणासारखी पांढरी खूण असते. लालसर रंगाची जीभ असते. हा सर्प ओसाड माळराने, तसेच मुरमाड खडकाळ प्रदेशात आढळतो. धोक्याची चाहूल लागताच हा सर्प आपल्या शरीरावरचे खवले एकमेकांवर घासून लाकडावर चालनाऱ्या करवतीसारखा आवाज काढतो. म्हणून याला सॉ स्केल व्हायपर म्हणतात. हा सर्प आपल्या सिरोंचा, अहरी, गडचिरोली भागात दुर्मिळ असून क्वचितच नजरेस पडतो. या सापाचा मानवी वस्तीशी फार कमी संबंध येतो. साप, बेडूक, सरडे, पाली, लहान साप आणि अनेक प्रकारचे किडे याचे भक्ष्य आहे. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते कळत नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो. सदर सापाला सुरक्षीत पकडण्यासाठी तीन तासाचे अथक प्रयत्न करून वन विभागाचे मदतीने सदर सापाला त्याचे नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here