


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी) : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक २३ जून २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दिनांक २३ जून रोजी सकाळी ८.१५ वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी.८.४५ वा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी उपस्थित. १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपस्थित. दुपारी १.३० वा.विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दु.२.३५ वा. जिल्हा परिषद येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित. सायं. ६ वा. विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार रामटेककडे प्रयाण.



























