



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा – काँग्रेस पक्षाचे गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार नामदेव किरसाण व विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर अहेरी नगरात आगमनाप्रित्यर्थ नगर पंचायत सिरोंचाचे उपाध्यक्ष बबलू पाशा व सभापती आणि नगरसेवकांनी अहेरी येथे जंगी स्वागत केले आहे.
यावेळी नपं उपाध्यक्ष बबलू पाशा व नपं चे सभापती आणि नगरसेवकांनी सिरोंचा शहर विकासवर व इतर विषयावर सविस्तर चर्चा केली. सिरोंचा शहरासह सिरोंचा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याची यावेळी नवनिर्वाचित खासदार नामदेव किरसान यांनी आस्वासन दिले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, नपं उपध्यक्ष बबलू पाशा,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,नपं सभापती नरेश अलोने,मारोती गणपूरपू,नागेश दुग्याला, शैलेंद्र सह सिरोंचा शहरातील आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



























