


सिरोंचा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत हमी भावाने सिरोंचा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर खरीप व रबी धानाचा पेरा उत्पादन जास्त आहे. त्या तुलनेत धान खरेदीची सुरूवात आदिवासी विकास महामंडळाने उशीरा केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली आहे.


शासनाने धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने खरेदी केंद्रावर
पडलेला शेतकऱ्यांचा धान काटा करण्यात आले नाही. त्यामुळे धान खरेदीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम यांनी दिला आला आहे.

शासकीय धान खरेदीत पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने ई-पीक नोंदणी प्रक्रिया सुरु केली. सातबारा नोंदणीकृत ई-पिके धान खरेदीसाठी पात्र मानली जाईल. मात्र नेटवर्क तसेच विद्युत समस्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी झालेली नाही. त्यामुळे
शेतकरी ई-पीक नोंदणीसाठी धावपळ करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
अशास्थितीत धान खरेदी ३० जूनपासून बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे धान खरेदीची मुदत वाढविण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आदिवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम, सूरज गावडे,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक नगराजू इंगली,अशोक इंगली, राजेश पडाली, लक्ष्मण बोल्लेसह सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले.


























