अतिवृष्टी,पुरामुळे नुकसान झालेल्यांची शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या – बानय्या जनगाम

125

सिरोंचा (प्रतिनिधी) गेल्या चार – पाच दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस आणि नद्यातून विसर्ग होत असलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याच्या फटका बसला आहे.
संततधार मुसळधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे सिरोंचा तालुक्यातील बामणी, झिंगानूर, असरअल्ली, रेगुंठा परिसरातील नागरिकांचे घरांचे पडझड तसेच शेतकऱ्यांच्या शेतात बॅक वाटर आणि पावसाचे पाणी गेल्याने अतोनात नुकसान

झाला,असून सरकार व संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँगेस नेते बानय्या जनगाम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here