सिरोंचा नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्यासह शेकडो समर्थकांचा राकॉँत प्रवेश -मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

879

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(विशेष प्रतिनिधी)
सिरोंचा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांचेसह नगराध्यक्ष तसेच त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लक्षात घेता. बबलू पाशांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉंमधील प्रवेश राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवे बळ देणारे ठरण्याची चिन्हे आहेत.
सिरोंचा नगरपंचायतवर बबलू पाशा यांच्या नेतृत्वातील संघटनेची एकहाती सत्ता आहे. बबलू पाशा यांचेकडे नगराध्यक्षासह उपाध्यक्ष पद असून अनेक नगरसेवकांचे समर्थन आहे. त्यांनी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा स्विकारल्यापासून सिरोंचा शहर हद्दीत अनेक विकास कामांना वेग आला आहे. अशातच बबलू पाशा यांचेसह नगरसेवक असलेल्या त्यांच्या काही समर्थकासह अनेकांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात राकॉंचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम  यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी बबलू पाशा यांचेसह त्यांच्या सहकार्यांना राकॉंचा दुपट्टा देत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशास्थितीत सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या बबलू पाशां यांचेसह त्यांच्या सहकार्यांनी राकॉंमध्ये प्रवेश केल्याने सिरोंचा तालुक्यातील राजकारणात निवडणूकीची रंगत अधिकच रोमांचकारी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here