संततधार पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांच्या मागणी

134

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

सिरोंचा (प्रतिनिधी ): मागील आठवडा भरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे आणि घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी केले आहे.

मागील अनेक दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील बामणी, रेगुंठा, टेकडा, झिंगानूर, असरअल्ली, सिरोंचा शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये घरातील घरामध्ये पाणी शिरले असून जीवनावश्यक सामान भिजून गेले आणि अनेक गावात घरांचे पडझड झाले असून यामध्ये नागरिकांचे पडून प्रचंड नुकसान झाले.तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने कापूस, धान व मिरची पिकांचे प्रचंड नुकसान झाली असून तात्काळ पडझड घरांचे व पाण्याखाली गेलेल्या शेतीचे सर्व्हेक्षण करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

आठवडाभरापासून पिके पाण्याखाली आलेले असतांनाही स्थानिक स्तरावर पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे व घर पडझडीचे पंचनामे करण्यात येवून नुकसान भरपाई मिळण्यासाठी
वरीष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल पाठवावे, अशी मागणीही बानय्या जनगाम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here